श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF
श्री राम रक्षा स्तोत्र अर्थ सहित (Lyrics)
विनियोग:
अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः ।
श्री सीतारामचंद्रो देवता ।
अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः ।
श्रीमान हनुमान कीलकम ।
श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः ।
अर्थ :- या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा ऋषि (रचणारा) बुधकौशिक असून छंद (वृत्त?) अनुष्टुभ् आहे, सीता आणि श्रीरामचंद्र या देवता आहेत, सीता शक्ती आहे, हनुमान आधारस्तंभ आहे आणि श्रीरामचंद्राच्या प्रेमाने जपासाठी वापरला जावा म्हणून हा स्तोत्ररूप मंत्र निर्माण केला आहे.
अथ ध्यानम्:
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं,
पीतं वासो वसानं नवकमल दल स्पर्धिनेत्रम् प्रसन्नम ।
वामांकारूढ़ सीता मुखकमलमिलल्लोचनम्नी,
रदाभम् नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलम् रामचंद्रम ॥
अर्थ :- आता ध्यानाची सुरुवात करू या. गुडघ्यापर्यंत हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करू या. त्याच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, श्रीरामाची नजर तिच्या मुखकमलाकडे लागलेली आहे. श्रीरामांची कांती मेघश्याम आहे. शरीर निरनिराळ्या अलंकारांच्या शोभेने झळकत आहे. मोठ्या जटांमुळे त्यांचा चेहरा सुशोभीत झालेला आहे.
राम रक्षा स्तोत्रम्:
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥1॥
श्रीरामाचे चरित्र शंभर कोटी श्लोकांइतके विस्तृत आहे. त्याचे केवळ एक अक्षरसुद्धा पुरुषाची मोठी पापे नष्ट करण्यास समर्थ आहे.
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं ॥2॥
नीलकमळासारखा सावळा रंग असलेल्या आणि कमळासारखे नेत्र असलेल्या रामाचे ध्यान करावे. सीता आणि लक्ष्मण ज्याच्या सन्निध असून ज्याचे मस्तक जटारूपी मुकुटाने सुशोभित आहे
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् ।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥3॥
आणखी एक म्हणजे मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही त्याने जगाच्या रक्षणासाठी स्वतःस मर्यादित स्वरूपात सहज लीलेने प्रकट केले आहे. बाकी अर्थ सहज स्पष्ट होईल
रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचे पठण करावे.(दुसऱ्या ओळीपासून कवच सुरू होते) रघूच्या कुळात उत्पन्न झालेला राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. दशरथाचा पुत्र कपाळाचे रक्षण करो.
कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचे रक्षण करो, विश्वामित्राला प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचे रक्षण करोत, इथे विशेषणाची चपखलता लक्षात घेण्यासारखी आहे. श्रुतींसाठी विश्वामित्राशी संबंधित विशेषणच का, कारण विश्वामित्राने श्रुतींद्वारे म्हणजे कानांद्वारे विद्येचे संस्कार रामावर केले. यज्ञाचे रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचे रक्षण करोत तर सुमित्रेचे ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचे रक्षण करोत.
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः ।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥
विद्येचा खजिना असलेले माझ्या जिभेचे रक्षण करोत (जीभ कारण तिच्या टोकावरच विद्या नर्तन करते असे मानतात) तर भरताला वंदनीय असलेले माझ्या कंठाचे रक्षण करोत. दिव्य शस्त्रास्त्रे असलेले माझ्या खांद्यांचे रक्षण करोत (खांद्यांचे कारण कदाचित काही अस्त्रे चालवण्यासाठी खांद्यांचा आधार घ्यावा लागत असावा). तर शिवधनुष्याचा भंग करणारे माझ्या भुजांचे रक्षण करोत (ज्या हातांनी शिवधनुष्य भंगले म्हणून हात).
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥
सीतेचे पती माझ्या हातांचे रक्षण करोत (पतीचा एक अर्थ रक्षणकर्ता. सीतेचे रक्षण करणारा माझेही रक्षण करो असे काहीसे) तर परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचे रक्षण करोत. खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचे रक्षण करोत तर जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभिचे रक्षण करोत.
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरु रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृताः ॥8॥
अर्थ :- सुग्रीवाचे देव माझ्या कंबरेचे रक्षण करोत तर हनुमंताचे प्रभु माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करोत. रघुकुळातले उत्तम (पुरुष) व राक्षसांच्या कुळांचा नाश करणारे माझ्या मांड्यांचे रक्षण करोत
जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामअखिलं वपुः ॥9॥
सेतु बांधणारे माझ्या गुडघ्यांचे रक्षण करोत तर दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण दशमुख रावणाचा अंत करणारे करोत. बिभीषणाला राज्य व संपत्ती देणारे माझ्या पावलांचे रक्षण करोत तर श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करोत.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृति पठेत ।
स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥10॥
(इथे कवच संपून फलश्रुति सुरू होते) जो पुण्यवान मनुष्य रामबलाने युक्त असा रक्षेचे (कवचाचे) पठण करेल तो दीर्घायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल
पातालभूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥
दुसऱ्या ओळीचा अर्थ – रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे असे (पहिल्या ओळीत वर्णन केलेले) मायावी आणि कपटी राक्षस नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन ।
नरौ न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥
राम अथवा रामभद्र अथवा रामचंद्र या नावाने जो स्मरण करतो तो मनुष्य कधीही पापाने लिप्त होत नाही व त्याला सुखोपभोग आणि मुक्ति मिळतात.
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् ।
यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥
अर्थ:- सर्व जग जिंकणाऱ्या या रामनामरूपी एका मंत्राने मनुष्याचे सर्व बाजूंनी रक्षण होते. जो हा मंत्र कंठात धारण करतो (पाठ करतो) त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात.
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत ।
अव्याहताज्ञाः सर्वत्र लभते जयमंगलम् ॥14॥
हे कवच वज्राचा पिंजऱ्यासारखे अत्यंत संरक्षक असल्याने याला वज्रपंजर असे नाव आहे. ह्या कवचाचे जो नित्य स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते आणि त्याला सर्वत्र मंगलमय विजय मिळतो
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥
भगवान शंकरांनी ज्याप्रमाणे स्वप्नात येऊन ही रामरक्षा सांगितली त्याप्रमाणे सकाळी उठून बुधकौशिक ऋषींनी ती लिहिली.
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् ।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान स नः प्रभुः ॥16॥
श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF
PDF Name | श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF |
Language | Hindi |
Category | Marathi |
No. of Pages | 11 |
PDF Size | 1 MB |
Quality | Excellent |
Source |
श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi PDF
श्री राम रक्षा स्तोत्र मराठी | Ram Raksha Stotram Marathi की पीडीऍफ़ कॉपी आप नीचे दिए लिंक से डाउनलोड कर सकते है।
Copyright/DMCA: GkNotesPDF does not own books pdf, neither created nor scanned. We just provide the link already available on the internet and in google drive. If any way it violates the law or has any issues then kindly mail us [email protected] to request removal of the link.