महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम मराठी अर्थ सहित
अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥
अर्थ – हे पर्वतकन्ये पार्वती ! तू सार्या पृथ्वीला आनंदित करणारी व संपूर्ण जगाला रमविणारी आहेस. शिवाचा गण नंदी तुझे स्तवन करतो.
पर्वतश्रेष्ठ विध्याद्रीच्या शिरावर तुझे वास्तव्य आहे. तू भगवान् विष्पूसह् विलास करतेस, व तेही तुला वंदन करतात.हे भगवती ! भगवान् नीलकंठाची तू पत्नी असून सारे प्राणीमात्र आपले कुटुंब मानणारी आहेस. सर्वांना ऐशर्य प्रदान करतेस.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥
अर्थ – नेहमी आनंदात मग्न असणार्या हे देवी ! श्रेष्ठ अशा देवांवर तू कृपेचा वर्षाव करणारी आहेस.
भक्तांनी केलेल्या जयघोषात रममाण होणार्या हे देवी ! तू दुर्मुब नावाच्या राक्षसाचा नाश करणारी, तसेच दुर्धर अशा राक्षसांना धाकात ठेवणारी आहेस.हे देवी ! तू त्रिभुवनाचे पालनपोषण करणारी, श्रीशंकराला संतोष देणारी आणि पापांचा परिहार करणारी आहेस.
हे समुद्रकन्ये ! तू दैत्यांवर क्रोधित होणारी, राक्षसांना शोषून टाकणारी आणि दुर्मद नावाच्या राक्षसेनापतीचा नाश करणारी आहेस.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमलय शृङ्गनिजालय मध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥
अर्थ – जगन्माते ! माझे आई! हास्यरसाचा स्वाद घेणार्या हे देवी ! तुला कदंबवनात राहणे फार आवडते. सर्व पर्वतात अत्यंत उंच अशा हिमालयाच्या शिरावर तुझे स्वतःचे निवासस्थान आहे.
मधाहून मधुर स्वभाव व रूप असणार्या देवी ! मधु व कैटभ़ राक्षसांना तू पराभूत केले आहेस. आणि कैटभ राक्षसाचा तर नाशच केलास. रासक्रीडेमध्ये देखील तू रममाण होतेस.
हे गिरिकत्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्द गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपातितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥
अर्थ – मोठी सोंड असलेल्या तुझ्या प्रचंड हत्तीने युद्धात शेकडो तुकडे करून छिन्न-भिन्न झालेली राक्षसांची घडाशिवाय मस्तके व मस्तकाशिवाय धडे आपल्या पायाखाली तुडवून टाकली आहेत.
शत्रूंच्या हत्तींची विशाल गंडस्थले फोडण्याचे कौशल्य असलेल्या पराक्रमी सिंहाची तू स्वामिनी आहेस. तू स्वतः आपल्या भुजदंडांनी चंड नावाच्या राक्षसांच्या सेनापतीस जमिनीवर पाडून ठार मारलेस. तसेच मुंड नावाच्या दैत्याची रणांगणात चिरफाड केलीस.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
अयि रणदुर्मद शत्रुवधोदित दुर्धरनिर्जर शक्तिभृते
चतुरविचार धुरीणमहाशिव दूतकृत प्रमथाधिपते ।
दुरितदुरीह दुराशयदुर्मति दानवदुत कृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥
अर्थ – युद्धात दैत्यांशी प्रसंग आला असताना युद्धाचा मद चढलेल्या शत्रूचा वध करण्यासाठी तू कधीही क्षीण न होणारी शक्तीधारण करतेस.
(युद्धाच्या अगोदर) विवेकशील, चतुर अशा थोर मनाच्या शंकराला (प्रथम गणांच्या अधिपतीला) तू आपला दूत म्हणून नेमलेस, पण (दैत्यांनी) दुर्वर्तनी, दुष्ट वासनेचे दुष्ट संकल्पाचे, आणि कुत्सित मनाचे असे दैत्य आपले दूत म्हणून पाठविले. परंतु तुझ्या दूतांनी त्यांची मती कुंठित करून टाकली.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
अयि शरणागत वैरिवधुवर वीरवराभय दायकरे
त्रिभुवनमस्तक शुलविरोधि शिरोऽधिकृतामल शुलकरे ।
दुमिदुमितामर धुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥
अर्थ – युद्धात दैत्यांशी प्रसंग आला असताना युद्धाचा मद चढलेल्या शत्रूचा वध करण्यासाठी तू कधीही क्षीण न होणारी शक्तीधारण करतेस.
(युद्धाच्या अगोदर) विवेकशील, चतुर अशा थोर मनाच्या शंकराला (प्रथम गणांच्या अधिपतीला) तू आपला दूत म्हणून नेमलेस, पण (दैत्यांनी) दुर्वर्तनी, दुष्ट वासनेचे दुष्ट संकल्पाचे, आणि कुत्सित मनाचे असे दैत्य आपले दूत म्हणून पाठविले. परंतु तुझ्या दूतांनी त्यांची मती कुंठित करून टाकली.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
हे गिरिकन्ये! तुझ्या केसांची वेणी रमणीय (सुंदर) आहे. तू महिषासुराचा नाश करणारी आहेस ! तुझा जयजयकार असो.
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi
PDF Name | महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi |
Language | Marathi |
Category | Marathi |
No. of Pages | 7 |
PDF Size | 1 MB |
Quality | Excellent |
Source |
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi
महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi की पीडीऍफ़ कॉपी आप नीचे दिए लिंक से डाउनलोड कर सकते है।
Copyright/DMCA: GkNotesPDF does not own books pdf, neither created nor scanned. We just provide the link already available on the internet and in google drive. If any way it violates the law or has any issues then kindly mail us [email protected] to request removal of the link.